कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप आघाडीचा झेंडा

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हापरिषदेच्या झालेल्या चुरशीच्या लढतीनंतर तसेच नाट्यमय घडामोडीनंतर भाजप आघाडीने अखेर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापनेत अध्यक्षपदी सौ.शौमिका अमल महाडिक( भाजप), तर उपाध्यक्ष पदी श्री.सर्जेराव पाटील , कळे (शिवसेना) यांची निवड करण्यात आली.

या निवडीवेळी भाजप आघाडीला ३७ मते तर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला २८ मते मिळालीत.  या निवडीत शिवसेनेत असलेली दुफळी पुन्हा एकदा समोर आली.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!