सामाजिक

अपघातात जखमी झालेल्या जवान गायकवाड यांचे निधन

शिराळा : तडवळे (ता.शिराळा) येथील अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवान दशरथ उर्फ पोपट कृष्णा गायकवाड (वय २८ वर्षे ) यांचा पुणे येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या बाबत समजलेली माहिती अशी, दशरथ हा पाच वर्षापूर्वी आर्मीमध्ये भरती झाला होता. तो सध्या जम्मू मधील प्रतापगड ब्लेसर येथे आर्मीच्या मँकेनिकल विभागात नोकरी करत होता. तो १८ एप्रील रोजी एक महिन्याच्या सुट्टीवर त्याच्या तडवळे गावाकडे आला होता. ७ मे रोजी तो कामानिमीत्त मोटर सायकल क्रमांक एम.एच.१० सी.सी. २५७६ वरून शिराळ्याला गेला होता. रात्री साडे दहा वाजणेच्या सुमारास तडवळे गावाकडे येत असताना, बिऊर तडवळे रस्त्यावर तडवळे हद्दीमधील जोतिर्लिंग मंदीरानजिक त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने शिराळा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र गंभीर जखम झाल्यामुळे त्यांना कराड येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले होते. मात्र त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यास पुणे येथील सैनिक दलाच्या कमांड हाँस्पिटल मध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज गुरूवारी सकाळी साडेआठ वाजणेच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा गावातील अश्निनी बरोबर दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यास दीड वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!