सरुडात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार -आमदार सत्यजित पाटील यांचा सक्रीय सहभाग

बांबवडे : सरूड तालुका शाहुवाडी इथं दारूबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारला आहे. आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचाही या मोहिमेस भक्कम पाठींबा मिळाला आहे. त्यामुळे महिलांच्या या लढ्यास बळ मिळाले आहे.
शनिवार दि.२७ मे रोजी सायंकाळी झालेल्या प्राथमिक संवाद सभेत महिलांनी दारूबंदीसाठी तीव्र भावना व्यक्त केल्यात. या मोहिमेत लागेल ती मदत करण्याचे अभिवचन देत, घरातील महिला सदस्याही या लढ्यात आघाडीवर राहतील,असा ठाम विश्वास,महिला संवाद सभेत दर्शवण्यात आला. महिलांची स्वाक्षरी मोहीम सुरु करण्याचे ठरवण्यात आले. जून च्या प्रारंभी महिला शिष्टमंडळ सोबत घेवून, तहसीलदारांना निवेदन देण्याचा मनोदय सुद्धा आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी बोलून दाखविला.

5+

2 thoughts on “सरुडात दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार -आमदार सत्यजित पाटील यांचा सक्रीय सहभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!