मेंढरांवर हिंस्त्र प्राण्याचा हल्ला : मेंढपाळ जखमी

शिराळा: करमाळा-पुदेवाडी (ता.शिराळा) येथील डोंगरात मेंढर चारावयास नेलेल्या बिरु अवगाडी बंडगर (२०) रा. शेंदूर जि. कोल्हापूर व सोमनाथ नामदेव एडके (३०)रा.जखीणवाडी कराड या मेंढपाळांवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून जखमी केले. तो हल्ला बिबट्याचा की तरसाचा या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.
हि घटना काल गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी, बिरु,सोमनाथ व भिकाजी जोग (११)रा. राशिवडे हे तिघे मेंढरं घेऊन चारावयास गेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाडीतून त्या हिंस्र प्राण्याने मेंढरांवर हल्ला केला. त्यास सोडवण्यासाठी बिरु, सोमनाथ गेले असता, त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता, इतर मेंढपाळ आल्याने तो हिंस्र प्राणी पळून गेला. तो हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे, मत मेंढपाळांचे असून तो तरस असावा, असे मत वनविभागाचे आहे.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!