पुणे उपमहापौर पदी वर्णी कुणाची ?

पुणे: पुणे मह्पालोका च्या उपमहापौर पदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सध्या पुणे महापालिकेमध्ये सुरु आहे.

पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदय विकाराने दुखद निधन झाल्याने, ते पद सध्या रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागणार, यासाठी चर्चा सुरु आहे. यासाठी दोन-तीन दिवसात शहर रिपाई ची बैठक होणार आहे. अशी माहिती शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी दिली.
यासाठी रिपाई मधून ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच नगरसेविका सुनिता वाडेकर यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. यासंदर्भात शहर रिपाई नेत्यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरस्तरावर बैठक घेवून निर्णय घेण्याची सूचना केली.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!