चांगल्या करिअर साठी अभियांत्रिकी योग्य पर्याय- प्राचार्य डॉ.आणेकर

वारणानगर : सध्याच्या काळात अभियांत्रिकी शाखेत विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत. अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या माध्यमातून ते इतर शाखांपेक्षा अभियांत्रिकी शाखेतून आपले चांगले करिअर निर्माण करू शकतात, असे तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. आणेकर यांनी विद्यर्थ्याना संबोधित करताना सांगितले.
शुक्रवार दि. ९ जून रोजी दुपारी ३ वाजता विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक सभागृहामध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०१७-१८ या विषयावर शिबीर उत्साहात पार पडले. तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.एस.बी.शहापुरे मॅडम, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस,व्ही.आणेकर, प्रा. बी.व्ही.बिराजदार व मान्यवर होते. यावेळी डॉ. आणेकर विद्यर्थ्याना संबोधित करत होते.
ते पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी विभागात संधी शोधणे गरजेचे आहे. केमिकल इंजिनिअर्स शाखेतून करिअर च्या विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच संशोधन व विकास यासाठी मोठी संधी सर्वच शाखेतून उपलब्ध होत आहेत. आजच्या काळात सिव्हील मध्ये सुद्धा खूप संधी आहेत.
प्रा. बी.व्ही. बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना आजची शासकीय प्रवेश प्रक्रिया (सी.ए.पी.)यावर मार्गदर्शन करताना सांगितले कि, हि प्रवेश प्रक्रिया तीन राउंड मध्ये राबविली जाणार असून, यात फ्रीज /स्लाईड/प्लोट याबाबत इत्थंभूत माहिती दिली. कॅप मधून योग्य कॉलेज व ब्रँचला प्रवेश कसा मिळवावा, कॉलेज ची फी किती, स्कॉलरशिप व सवलती कोणत्या, कागदपत्रे कोणती लागतात, कटऑफ अशा अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
यावेळी अमृता अशोक पाटील ९२.२३ %, शुभांकर उगळे ८९.३३%, या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व आभार सी.पी. शिंदे यांनी मानले.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!