१५ जून रोजी इचलकरंजी त मुद्रा बँक मेळावा-जिल्हाधिकारी

कोल्हापूर : उद्या दि. १५ जून रोजी इचलकरंजी इथं मुद्रा बँक योजना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून ,अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा,हा हयामागील उद्देश आहे. यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले आहेत.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्यावतीने मुद्रा बँक योजना मेळावा हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी इथं आयोजित करण्यात आला आहे. यात युवक -युवतींना या योजनेंतर्गत कर्ज प्रकरणांची सविस्तर माहिती सर्व बँकांच्या सहकार्याने दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ३३ बँकांचे सहकार्य या मेळाव्यासाठी लाभले आहे. या मेळाव्यात कर्ज प्रकरणांसाठी लागणारे फॉर्म चे नमुने उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या युवक-युवतींचे प्रस्ताव हि बँकांच्या माध्यमातून दाखल करून घेण्यावरही भर दिला जाणार आहे.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गत शिशु,किशोर,आणि तरुण या तीन गटांमध्ये त्या त्या कर्ज मर्यादेत प्रस्ताव दाखल करून घेतले जाणार आहेत .यामध्ये शिशु गटात १० ते ५० हजार रुपयांपर्यंत, किशोर गटात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत, तर तरुण गटात ५ ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होवू शकते. यामध्ये छोटे-मोठे कुशल व्यावसायिक, व्यापार, शेती आधारित व्यवसाय आदि उपक्रमांसाठी कर्ज प्रकरणे करता येतील. यासाठी जामीन अथवा अनुषांगिक तारण घेतले जाणार नाही.
उद्या गुरुवार दि.१५ जून रोजी इचलकरंजी येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवन इथं सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा मेळावा होणार आहे. याचा लाभ युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले आहे.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!