पन्हाळा पोलिसांकडून प्रेमी युगुल , बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई

कोडोली प्रतिनिधी:-

पन्हाळा पोलीस ठाणे च्यावतीने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र साळोखे पन्हाळगडावर जकात नाका पन्हाळा येथे दर शनिवारी व रविवार नाकाबंदी राबवून तसेच पेट्रोलिंग करतात.
पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकाना कसलाही त्रास होऊ नये, तसेच पर्यटकांना पन्हाळगडावर सहज फिरता यावे, याकरीता जकात नाका पन्हाळा व पन्हाळगडावर पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
सदर नाकाबंदी व पेट्रोलिंग करून विनापरवाना वाहन चालविणे, दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट न वापरणे, तसेच प्रेमी युगुल यांचेवर 110/117 प्रमाणे 13 जणांवर कारवाई करण्यात आली.
त्यामध्ये काही लोकांच्यावर मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट पन्हाळा यांच्या कोर्टात हजर केले. त्याची नावे अशी
1) प्रशांत महादेव कोरे रा शनिवार पेठ कोल्हापूर
2) शुभम श्रीकांत सागावकर रा. शनिवार पेठ कोल्हापूर
3) सिद्धेश नितीन आंबेकर रा. शुक्रवार पेठ कोल्हापूर
4) रोहित दिलीप कोपडे रा. बुरुड गल्ली शनिवार पेठ कोल्हापूर
5) स्वप्नील राजेंद्र सूर्यवंशी रा बुरुड गल्ली कोल्हापूर
खालील प्रेमी युगुल
7) विशाल प्रकाश आकिवाटे रा. कोल्हापूर
8)रणजीत हरिभाऊ लोकरे रा सावर्डे ता. पन्हाळा
9) सुरज प्रदीप पाटील रा. इचलकरंजी
10) ओंकार महादेव तेली रा. कागल ता. कागल
वरील लोकांना मा. कोर्टाकडून 6, 500/- रुपये इतका दंड केला .
तसेच 1 जून पासून आजअखेर एम.व्ही. ऍक्ट 112 केसेस 37,400/- इतका दंड वसूल करणेत आला. यापुढेही अशीच कारवाई सुरू ठेवणेत येत आहे. सदर मोहीमेमध्ये पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र साळोखे , पोलीस उपनिरीक्षक शशिकांत गिरी, पोलीस कर्मचारी , भाट, सावंत, बुचडे, आयरे ,पोवार ठाणेकर, जाधव यांनी काम केले.

2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!