कोडोली येथे एकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

कोडोली प्रतिनिधी: कोडोली ता.पन्हाळा येथील शेख रोड वाशिकर वाडा येथे राहणारे विश्वास नागेश काळे यांनी आज दिनांक २१ जुलै रोजी दुपार ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटना स्थळावरून मिळालेली मिळालेली माहिती अशी,कोडोली येथे वाशिकर वाडा येथे विश्वास काळे यांनी राहत्या घरी थीमेट हे विषारी औषध प्राशन करून केले यावेळी त्यांची पत्नी व सून घरी होत्या त्यांना समजताच नाही शेजाराच्या मदतीने त्यांना उपचारासाठी कोडोली उपजिल्हा रुग्णालय,कोडोली मध्ये घेऊन गेले. पण त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले.यावेळी विश्वास काळे यांच्या नातेवाईकांनी त्यांना वारणानगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे नेले,पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.विश्वास काळे यांचा पश्चात पत्नी,तीन मुले,तीन सुना व नातवंडे असा परिवार आहे…

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!