वेखंड वाडी विद्यार्थ्यांची शिवारफेरी

पैजारवाडी प्रतिनिधी:-
शेती विषयी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शेतीच्या कामांची आणि शेती अवजारांची माहिती वजा ओळख व्हावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यावर बालवयातच श्रमसंस्कार व्हावेत. या हेतूने विद्यामंदिर वेखंडवाडी ( ता पन्हाळा ) शाळेतील विद्यार्थ्यांची शिवारफेरी काढण्यात आली.
शिवारफेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी गावातीलच काही शेतकऱ्यांच्या शेतांवर भेटी घेतल्या, आणि पिकाची व शेतात सुरु असलेल्या कामांची माहिती घेऊन पहाणी केली.
यामध्ये भातरोप लावणे, कोळपणी, भांगलन करणे, कीडनाशक फवारणी, या सारख्या अंतरमशागत शेतकामाची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली, व त्या कामांसाठी वापरली जाणारी शेती अवजाराची माहिती विद्यार्थ्याना शेतकऱ्यांकडून देण्यात आली.
या वेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांच्या अति वापरामुळे शेतजमिनीवर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती दिली, आणि गांडूळ खतासारख्या सेंद्रिय खतांचा वापरण्यासाठी विनंती केली .
याप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षक गुलाब बिसेन ,मुख्याध्यापक अविनाश माने यांनी मार्गदर्शन केले.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!