गोकुळ चे “ऋण ” न फिटणारे

कोल्हापूर : गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांनी निराधार महिलांकडून राखी बांधून घेवून रक्षाबंधन केले आहे. हि गोष्ट निश्चितच समाजाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
२००५ सालापासून तत्कालीन व विद्यमान चेअरमन श्री.विश्वास नारायण पाटील यांनी गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्याकडून आपल्याला व सहकारी संचालकांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून घेण्याचा पायंडा जपला आहे. त्यानुसार चेअरमन श्री.पाटील यांनी आज रक्षाबंधन निमित्त राजापूर तालुका शिरोळ येथील श्रीमती भारती चिंचणे, व बेलवले तालुका कराड येथील श्रीमती वैशाली शिंदे यांच्याकडून गोकुळ च्या ताराबाई पार्क कोल्हापूर येथील कार्यालयात राखी बांधून घेतली.
यावेळी श्रीमती वैशाली शिंदे यांनी गोकुळचा ऋणानुबंध जीवनात नवीन आशा आकांक्षा निर्माण करणार असून, हे ऋण या जन्मी न फिटणारे आहे. गोकुळच्या सहकार्यामुळेच मी माझ्या परिवाराचे पालनपोषण चांगल्याप्रकारे करू शकले, याचे मला समाधान आहे. माझ्यासारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद गोकुळ परिवाराच्या पाठीशी आहेत. माझ्या आप्तेष्टांनी मला एक असाध्य रोग झाल्यामुळे माझा विश्वासघात केला. परंतु मी न डगमगता गोकुळ च्या सहकार्यामुळेच गेली १५ वर्षे महिलांमध्ये प्रबोधन करत आहे.
राजपूर तालुका शिरोळ येथील महिला भारती चिंचणे यांचे पती २००५ साली आलेल्या महापुरात वाहून गेले. एवढेच नाही तर त्यांचे राहते घर व जनावरे देखील या महापुरात वाहून गेली होती. त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना , तत्कालीन चेअरमन विश्वास पाटील यांनी चिंचणे यांना घर बांधण्यासाठी गोकुळ च्यावतीने आर्थिक सहकार्य करून त्यांच्या जीवनाला जगण्याची उमेद दिली. म्हणून चिंचणे या प्रतिवर्षी चेअरमन विश्वास पाटील यांनी राखी बांधत आहेत.
निराधारांना आधार देणार गोकुळ आणि विश्वासराव याचं ऋण मानावे तितके थोडे आहे. कारण आप्तस्वकीयांनी विश्वासघात केलेल्यांना भक्कम विश्वास देणारं गोकुळ निश्चितच ‘ निराधारांचा आधार ‘ आहे. यावेळी दुध संकलन अधिकारी दिलीप पाटील, रमेश पाटील, मोहन यादव, सचिन पाटील, व सौ राजश्री चव्हाण आदी उपस्थित होते.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!