कोडोलीतील उमेश शिंदे वाहक, प्रदीप जाधव चालक प्रामाणिक सेवेचा सत्कार

कोडोली प्रतिनिधी:
कोल्हापूर आगाराच्या कोल्हापुर – सांगली एसटी बस वर सेवा बजावत असलेले कोडोली तालुका पन्हाळा येथील वाहक उमेश सर्जेराव शिंदे व चालक प्रदीप गणपतराव जाधव यांनी प्रवाशाची सुमारे पावणे तीन लाख रुपये असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढी मोठी रक्कम प्रामाणिक पणे परत केल्याबद्दल आगार व्यवस्थापकांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.
बुधवार दि.६सप्टेंबर रोजी वाहक उमेश शिंदे चालक प्रदीप जाधव हे कोल्हापूरहून सांगलीकडे कोल्हापूर आगाराची बस घेऊन दुपारी एकच्या सुमारास चालले होते या बसमध्ये कित्तूर येथील दुग्धव्यावसायिक राजेंद्र अण्णा डोणे हे चढले होते हातकणंगले स्टॉपवर ते पैशाची पैसे असलेली बॅग गाडीतच विसरून उतरले होते आपण त्या बसमध्ये बॅग विसरलो आहोत. हे त्यांच्या लवकर लक्षातही आलं नाही. या बॅगमध्ये रोख रक्कम २ लाख ८८ हजार रुपये तसेच बँकेचे पासबुक नवीन गाडीची कागदपत्रे होती. यांमध्ये कोणताही त्यांचा संपर्क नंबर नव्हता.
बस सांगली येथे आल्यावर वाहक उमेश शिंदे यांच्या, प्रवाशांची बॅग राहिली आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी सदरची बॅग ताब्यात घेतली. वाहक शिंदे व चालक जाधव हे दोघेही बस घेवून कोल्हापूरमध्ये आल्यावर त्यांनी कंट्रोल रुमला सदरची बॅग जमा करुन ते पुन्हा बस घेऊन जोतिबा रुटला जोतिबा येथे गेले होते. याच दरम्यान प्रवासी राजेंद्र डोणे यांनी आगारात येऊन कंट्रोल रूमला सदर गाडी संदर्भाने विचारणा करीत, आपली बॅग गाडीमध्ये विसरलीआहे, हे सांगताच या बॅग मध्ये काय होते वगैरे याची खातरजमा करून सदरची बॅग आगार व्यवस्थापक सुनील जाधव यांच्या समक्ष वाहतूक नियंत्रक दीपक घाडगे, आर. डी. कदम, राजू येलपरवाड यांनी प्रवासी राजेंद्र डोणे यांना संपूर्ण रक्कम मोजून खातरजमा करून ताब्यात दिली.
प्रवासी डोणे यांनी कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक वाहक चालकांचा सत्कार करण्यासाठी ते आगारात थांबून राहिले होते. वाहक उमेश शिंदे चालक प्रदीप जाधव हे जोतिबा वरून परत आगारात आलेवर त्यांचा सर्वांचा वतीने सत्कार करण्यात आला प्रामाणिकपणाबद्दल दोन हजाराचे बक्षीस डोणे यांनी दिले. या कोडोलीच्या या दोन सुपुत्रांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. जाधव व शिंदे हे कोल्हापूर आगाराकडे गेली वीस वर्षे सेवा बजावत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक सेवेने एसटी महामंडळाचीही प्रतिमा उंचावली आहे. परिवहन महामंडळाचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी या प्रामाणिकपणाबद्दल ची दखल घेऊन अभिनंदन केले आहे असे समजते.

3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!