भाजप ओबीसी पन्हाळा अध्यक्षपदी संदीप कुंभार

पैजारवाडी प्रतिनिधी : बोरपाडळे तालुका पन्हाळा येथील संदीप सर्जेराव कुंभार यांची भाजप च्या ओ.बी.सी. पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल कुंभार समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पन्हाळा-बावडा कुंभार समाजाचे अध्यक्ष रामचंद्र कुंभार, उपाध्यक्ष विक्रम कुंभार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
प्रथम संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कुंभार समाजातील जेष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच शरद जाधव, सचिव राजाराम कुंभार, आदिनाथ कुंभार, तसेच ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ, दै.पुढारीचे पत्रकार कृष्णात हिरवे, पत्रकार श्रीकांत कुंभार व समस्त कुंभार समाज उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान कुंभार तर आभार सर्जेराव दगडू कुंभार यांनी मानले.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!