ताबूत मिरवणुकीत के एम टी घुसल्याने २ ठार तर ५ गंभीर जखमी

कोल्हापूर : ताबूत(मोहरम ) विसर्जन मिरवणुकीत के एम टी बस घुसली.आणि या अपघातात २ ठार , ५ गंभीर जखमी झाले आहेत. आज ( रविवार १ ) सायंकाळी ८ च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने केएमटी बस वर हल्ला चढवला. यामुळे या घटनेने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले.
ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज शहरात मोहरम मिरवणूक होती. या मिरवणुकीतील काही पंजे वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्याचवेळी शिवाजी चौकाकडून गंगावेश कडे निघालेल्या केएमटी बसचा ब्रेक निकामी होऊन बस मिरवणुकीत घूसली. या मिरवणुकीत ३ हजारहून अधिक लोकांचा जमाव घटनास्थळी होता . या वेळी येथे आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच देखील या वेळी फोडण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण बनलेने जलद कृती दलाचे दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!