कोडोलीत चोरी प्रकरणात दोघास अटक

कोडोली वार्ताहर:-कोडोली ता.पन्हाळा पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरांना अटक केली आहे. कांदे ता.शिराळा येथील राजाराम कांबळे आणि यांच तालुक्यातील रेड येथील सुरेश भरती या दोघांनी जबरी चोरीचा बहाणा करून ओळखीच्या एका महिलेचे दागिने लुटले होते.
आशा मनोहर अस्वले हि महिला दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी तिचा मानलेला भाऊ राजाराम कांबळे सोबत कोडोलीहुन मोहरे या तीच्या गावाच्या दिशेन जात असताना , रात्री साडेआठ वाजता काखे फाटा येथे आले असता, पाठीमागून एक अज्ञात इसम आला,आणि त्यांने त्याची मोटरसायकल आडवी लावून राजाराम कांबळे यास मारहाण केली. आणि आशा अस्वले यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि कानातील सोन्याच्या रिंगा जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले. याबाबत आशा अस्वले यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिनांक १५ सप्टेंबर २०१७ रोजी तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासा दरम्यान राजाराम कांबळे यांच्या जबाबात विसंगती आढळल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपण, आपला शिराळा तालुक्यातील रेड येथील साथीदार सुरेश भरती याच्या मदतीने आशा अस्वले यांच्या समोर मारहाणीचा खोटा बनाव करून त्यांचे दागिने लुटल्याचे कबूल केले. या दोघांनाही ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, आणि ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा अशा मुद्देमाला सहित पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!