मैत्रिणींचा ‘ माणुसकीचा गहिवर ‘ : आर्थिक मदत

कोडोली वार्ताहर-:
वारणानगर ता.पन्हाळा येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. नम्रता प्रभाकर पोवार हिच्या कुटूंबास नुकतीच ११ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली . पारगाव ता. हातकणलगले येथे झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात ‘ नम्रता ‘ चे घर उध्वस्त झाले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.सुरेखा शहापुरे, प्रा. नितीन कळंत्रे यांच्या हस्ते आणि नम्रताच्या मैत्रिणी कु. श्रेया घाटगे , प्रतीक्षा अस्वले, उज्वला पाटील, आदिती पाटील, प्रणोती हुजरे, प्रीती मोरे , किशोरी चिबडे, आफरीन खान यांनी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी यांना आवाहन केले., त्या आवाहानाला सर्वांनीच भरघोस प्रतिसाद देत, आपल्या वर्गमैत्रिणीला आर्थिक मदत करून, सामाजिक बांधिलकी जपुन, धीर दिल्याबद्द्ल महाविद्यालयातील सर्वच घटकांनी नम्रताच्या मैत्रिणींचे अभिनंदन केले.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!