सांगली तील अपघातात १० ठार तर १३ जखमी

सांगली : सांगली जिल्ह्यातील मणेराजुरी जवळ फरशी ने भरलेला ट्रक पलटी झाल्याने, झालेल्या अपघातात सुमारे १० जण मृत्युमुखी पडले असून, १३ जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये ५ स्त्रिया तर ५ पुरुष यांचा समावेश आहे.
हा ट्रक लादी घेवून कर्नाटक कडून कराडला निघाला होता. तासगाव-कवठेमहांकाळ मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन ते तीन वाजनेच्या दरम्यान हा अपघात घडला आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे. एसटी बस बंद असल्याने कराड ला मोलमजुरी करण्यासाठी येणारे मजूर या ट्रक ने प्रवास करीत होते.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!