‘बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या सांगोला शाखेची सुमारे ७० लाख रुपयांची रोकड लंपास

सोलापूर : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ च्या सांगोला शाखेची सुमारे ७० लाख रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लुटल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र च्या सांगोला शाखेचे मॅनेजर अमोल भोसले हे आपल्या आय ट्वेंटी क्र. MH45-N-5831 या वाहनातून रोकड घेवून पंढरपूर कडे निघाले होते. तसेच या गाडीत सुरक्षा रक्षक सुद्धा नव्हते. या गोष्टी ची माहिती दरोडेखोरांना लागली होती. असा अंदाज आहे. ते दरोडेखोर सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर जगताप मळ्याजवळ दबा धरून बसले होते. गाडी त्यांच्या टप्प्यात आल्यावर, त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांनी गाडीला ओव्हरटेक करून गाडी अडवली ,आणि गाडीतून ७० लाख रुपयांची रोकड लांबवली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!