बांबवडे एसटी स्थानकानजीक डंपर ची अनेक वाहनांना धडक : १ ठार ,तर ५ जखमी

बांबवडे : बांबवडे तालुका शाहूवाडी येथील एसटी स्थानकानजीक एका डम्पर ने अनेक वाहनांना दिलेल्या धडकीमुळे झालेल्या अपघातात १ ठार तर ५ जखमी झाले आहेत. पैकी डोणोली येथील शिवाजी शेळके ( तात्या ) यांना डोक्याला मार लागल्याने कोल्हापूर येथे उपचारार्थ नेण्यात आले आहे.
या अपघातात खुटाळवाडी ,तालुका शाहुवाडी येथील तुकाराम ईश्वरा खुटाळे(वय ५० वर्षे )रा. खुटाळवाडी हे जागीच ठार झाले. तर डोणोली येथील शिवाजी शेळके (वय ६५ वर्षे )हे गंभीर जखमी झाले आहेत.इतर जखमींची नावे: दत्तात्रय दादू खुटाळे (वय ५५ वर्षे ), संजय यशवंत बाचणकर (वय ४२ वर्षे ) रा. भाडळे, सागर अनिल काळे (वय ३२ वर्षे )रा. बांबवडे, नितीन गोविंद पाटील (वय ३५ वर्षे )रा.सावे,अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खडीने भरलेला डम्पर क्रमांक MH50- 0061 हा कोल्हापूर दिशेहून मलकापूर कडे निघाला होता. या डंपरने बांबवडे एसटी स्थानकानजीक उभ्या केलेल्या दोन दुचाकी स्प्लेंडर, एक ओमनी, एक मायक्रा अशा दोन चार चाकी वाहनांना जोरदार धडक दिली आहे. विशेष म्हणजे हि सगळी वाहने उभी होती. जी मंडळी जखमी आहेत,ती सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र बांबवडे च्या समोर उभी होती. अशावेळी कोल्हापूर दिशेहून आलेल्या डम्परने वाटेतील आवळी गावापासून बेदरकारपणे वाहन चालवत आले असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही.

18+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!