बांबवडे त ‘ होंडा ‘ चा भव्य ‘महा एक्स्चेंज व लोन मेळा ‘ दि.१७,१८,१९ नोव्हेंबर

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं बँक ऑफ महाराष्ट्र समोर होंडा कंपनीच्या मोटरसायकल चा भव्य ‘ महा एक्स्चेंज व लोन मेळा ‘ आयोजित करण्यात आला आहे. या मेळ्याचे उद्घाटन माजी सरपंच विष्णू यादव व प्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब खुटाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. हा मेळा सिद्धीविनायक ऑटोमोबाईल्स बांबवडे च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
हा मोटरसायकल चा भव्य ‘ महा एक्स्चेंज व लोन मेळा ‘ दि. १७,१८, १९ नोव्हेंबर पर्यंत चालणार असून, यामध्ये वेगवेगळ्या मॉडेल्स च्या दुचाकी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच स्कूटर्स सुद्धा आपल्याला हव्या त्या रंगात उपलब्ध आहेत. एक्स्चेंज साठी सुद्धा तरतूद केली असल्याने, जुनी गाडी बदलून नवीन गाडी खरेदी करता येते. यासाठी लोन सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल असे सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स चे मालक शशिकांत सिंघन व माया ड्रीम्स होंडा कोल्हापूर चे मालक श्री मुकेश भंडारी यांनी सांगितले.
यावेळी होंडा कंपनीचे एरिया मॅनेजर श्री हर्षल सोनटक्के, सेल्स मॅनेजर विद्यासागर आयरेकर , टीम लीडर कुमार पंडत, अभयसिंह चौगुले, तसेच कृष्णात दिंडे ,सयाजी निकम, सुरज बंडगर,जालिंदर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!