कोथळे हत्या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सांगली : चोरी प्रकरणातील आरोपी अनिकेत कोथळे यांच्या हत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. या प्रकरणी सांगली चे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे , व शहराच्या उपाधीक्षिका दिपाली काळे यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दत्तात्रय शिंदे यांची नागपूर राज्य राखीव दलाच्या समादेशक पदी बदली करण्यात आली आहे,तर उपाधीक्षक दिपाली काळे यांची उपायुक्त सोलापूर शहर पदी बदली करण्यात आली आहे.
आरोपी अनिकेत कोथळे चा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला. या कारणास्तव जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन झाल्याने, हा एक सुधारण्याचा प्रयत्न असावा.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!