शिराळा मध्ये दि.२० ते २२ डिसेंबर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

शिराळा : :येथील कन्या शाळेत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बुधवार दि.२० शुक्रवार दि. २२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.
२० डिसेंबर ला सकाळी विज्ञान दिंडी काढण्यात येणार आहे . सकाळी ११वाजता प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष सुधाकर हसबनीस तर प्रमुख पाहुणे माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, सभापती सौ. मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंग नाईक, नगराध्यक्षा सौ.सुनंदा सोनटक्के, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे आहेत .
२१ डिसेंबरला गुरुवारी सर्व गटातील उपकरणांचे परिक्षण करण्यात येणार असून, प्रदर्शन पहाण्यासाठी खुले असणार आहे. शुक्रवारी २२ डिसेंबरला सकाळी नऊ ते आकरा पर्यंत फेर परिक्षण होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ ११ वाजता होणार आहे. या वेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन तर प्रमुख पाहुणे रणधीर नाईक, अभिजित नाईक, द. रा. महाजन, महेश चोथे, ब. ची.दिगवडेकर, दिपक शिंदे आहेत.
या प्रदर्शनात सहभागी व्हावे असे मुख्याध्यापक सौ. एम एम कुंभोजे , विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व बी आर पाटील यांनी केले आहे.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!