उपजिल्हा रुग्णालय मध्ये आयुष रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन

कोडोली वार्ताहर :
कोडोली ता.पन्हाळा येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी आयुष विभागामार्फत आयुष रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदचे सदस्य डॉ.सूर्यकिरण वाघ यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी डॉ.सूर्यकिरण वाघ यांनी आयुष चिकित्सा पद्धतीचा रुग्णांनी दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग करून, निरोगीआयुष्य जगावे असे सांगितले.
या शिबिरामध्ये आयुवैदिक पद्धतीने आम्लपित्त, मधुमेह व आयुवैदिक पद्धतीने वेदनाशमन (संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी) त्वचारोग, मुतखडा या व्याधीवर रोगनिदान व उपचार करण्यात आले. या शिबिरात कोडोली तसेच कोडोली परिसरातील जवळपास ३५३ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी आयुष कक्षात कार्यरत असणारे डॉ.सुलेखा साळुंखे, डॉ.वैशाली पावसे,डॉ.वर्षा ठोंबरे,डॉ. आशपाक मुजावर यांनी तपासणी केली, तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर. आर. शेट्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
या शिबीर कार्यक्रमास रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी , तुषार माळी, सतीश पाटील यांचे सहकार्य लाभले..

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!