अंगणवाडीचे स्नेहसंमेलन बालकांच्या विकासाला प्रेरणा देणारे- बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ

कोडोली प्रतिनिधी:-
अंगणवाडीचे स्नेहसंमेलन लहान बालकांच्या विकासाला प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले.
कोडोली ता. पन्हाळा येथील एकात्मीक बालविकास प्रकल्प पन्हाळाच्या बालविकास अधिकारी ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ अंगणवाडीचे सामूहिक वार्षिक स्नेहसंमेलन, कोडोली हौसींग सोसायटीच्या सांस्कृतिक भवन येथे पार पडले. यावेळी उद्घाटन प्रसंगी सोमनाथ रसाळ यांनी वरील प्रतिपादन केले.
अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांच्या सुप्त गुणांचा विकास होण्यास सेविका मदतनिस यांचे योगदान आहे. सेविका मदतनिस यांना वाढीव झालेल्या वेतनवाढीचा फरक लवकरच शासन देणार आहे. असे पन्हाळा पंचायत समितीचे सभापती पृथ्वीराज सरनोबत यानी सांगीतले.
डिजीटल शाळे पाठोपाठ डिजीटल अंगणवाडी हा लोक सहभागातून उपक्रम राबवावा, असे रणजीत शिंदे यानी सांगीतले. शासन स्तरावर तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंगणवाडी यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन, वारणा बॅकेचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रशांत जमणे यानी सांगीतले.
पर्यवेक्षिका ज्योती कांबळे यांनी स्वागत केले. सहा. प्रकल्प अधिकारी प्रतिभा शिर्के यांनी प्रास्ताविकात अंगणवाडीच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्याच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पन्हाळ्याच्या नायब तहसिलदार सौ. माधुरी जाधव,पंचायत समिती सदस्य अनिल कंदुरकर, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखील पाटील, सर्व सदस्य, बालविकास प्रकल्पच्या पर्यवेक्षका शोभा गुरव, आशा पोमन्नावर, रेखा ओतारी, मेघा माळी, सुशिला भोसले, अनुराधा दळवी, रसिका अत्तार सर्व सेविका, मदतनीस, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यवेक्षक वैशाली सामंत, सेविका वैशाली चव्हाण, ज्योती माने, पूनम जाधव यानी सूत्रसंचलन केले, दिलशाद नदाफ यानी अभार मानले.
आधुनिक गीत संगीताच्या तालावर बालकांनी सामूहिक धरलेला ठेका या स्नेहसंमेलनात सर्वाच्याच कौतुकांचा ठरला.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!