सशक्त आरोग्यासाठी योग प्राणायम गरजेचे- योग शिक्षक डॉ.दळवी

मलकापूर प्रतिनीधी :
आपले आरोग्य निरोगी आणि सशक्त ठेवण्या बरोबरच आपले मानसिक मनोबल उंचावण्यासाठी आपण योग प्राणायम करणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन योग शिक्षक डॉ.दळवी (म्हाळुंगे ) यांनी मलकापूर येथे आयोजित योग शिबीर मध्ये केले .
पतंजली योग समिती प्रमुख पुजा धावडे यांच्या नियोजना खाली शिवाजी स्टेडीयम मलकापूर येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या शिबीरात योग शिक्षक म्हणुन डॉ. दळवी यांनी योग आणि प्राणायम याचे प्रात्यक्षिक, आणि आपल्या जीवनात त्याचे असलेले महत्व याचे मार्गदर्शन केले. शिबीरात शंभर नागरीकांनी सहभाग घेतला होता.
====अखेरच्या दिवशी भव्य सुर्यनमस्कार===
शिबीराच्या सांगते दिवशी शिवाजी स्टेडीयम येथील पुजा धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे सातशे शालेय विद्यार्थी यांनी या भव्य सुर्यनमस्कार शिबीरात सहभाग घेतला. या शिबीराचे उदघाटन उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी येळाणे ग्रामपंचायत सदस्य रोहीत जांभळे, प्राचार्य साठे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. क्षितीजा धावडे व अक्षय सांळुखें यांनी सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखवले.
सुर्यनमस्कार शिबीरात कुमार विद्यामंदीर मलकापूर, केंद्र शाळा मलकापूर , विद्या मंदीर येळाणे, गर्ल हायस्कूल मलकापूर, ग.रा. वारंगे कॉलेज मलकापूर , मलकापूर हायस्कूल या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते . यावेळी कॉलेजचे प्राचार्य, शाळाचे मुख्याध्यापक ,अध्यापक, अध्यापिका उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीचे संभाजी लोहार, श्री मुसळे, रूपेश वारंगे, रोहीत जांभळे, गोरख पाटील, रमेश पोतदार, प्रा शिवाप्पा पाटील, सविता साळुंखे, क्षितीजा धावडे, ,सौ वारंगे , यांनी विशेष प्रयत्न केले.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!