बोरपाडळे मध्ये बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा

पैजारवाडी प्रतिनिधी:-
कोल्हापूर जिल्ह्याचे संघटक मंत्री मा.बाबा देसाई यांच्या वाढदिवसा निमित्त पश्चिम महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने, आणि सुरभी जिमच्या वतीने राज्य स्तरीय शरीर शौष्ठव स्पर्धा बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा वजनी किलो गटानुसार घेण्यात आल्या.
५५-६० किलो गटामध्ये विजय शिंदे (कोल्हापूर), ६०-६५ किलो गटामध्ये मुहमद्द बेफारी (सांगली), ६५-७० किलो गटामध्ये सुनील हसमने (कोल्हापूर), ७०-७५ किलो गटामध्ये हर्षद मेटकरी (सांगली), तर खुल्या गटामध्ये अजिंक्य रेडकर (कोल्हापूर), यांनी प्रथम क्रमांकाचा पश्चिम महाराष्ट्र श्री किताब पटवला. तसेच प्रमोद पाटील (कोडोली) हा सुरभी श्री २०१८ चा मानकरी ठरला. त्याच बरोबर बेस्ट म्युजिक पोझर म्हणून सुनील हसमनी, बेस्ट मस्क्युलर म्हणून हर्षद मेटकरी, तर बेस्ट ऑब्स म्हणून विजय शिंदे यांची निवड करण्यात आली.
या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष मा. हिंदुराव शेळके, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष मा. महेश जाधव, शाहूवाडी पन्हाळा विधानसभा संपर्क प्रमुख अजितसिंह काटकर, भारत श्री विभीषण पाटील या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली.
विवेक रणनवरे, विजय मोरे, राहुल परीट, यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेसाठी सुरेश बेनाडे, अविनाश चरणकर, ओबीसी अध्यक्ष संदीप कुंभार, सचिन शिपुगडे, बोरपाडळे सरपंच शरद जाधव, उपसरपंच संगीता कोळी , सर्व ग्राम पंचायत सदस्य, चेअरमन अतुल ( बंडा) पाटील , ग्रामस्थ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यातील स्पर्धक, प्रेक्षकानी मोठी गर्दी केली होती.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!