साहेब तुमच्या ” xxx ” इथे आहेत

बांबवडे : छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला शाहुवाडी तालुका आहे. हा तालुका स्वाभिमानाचे प्रतिक मानला जातो.याचे कदाचित इथल्या काही अधिकारी वर्गाला भान नसावे. आपली खुर्ची सांभाळण्यासाठी वरिष्ठांशी किती लाळघोटेपणाने वागावे यालासुद्धा मर्यादा आहेत. इथलेच एक अधिकारी आपली वरिष्ठांची पादत्राणे कुठे ठेवली आहेत, हे न विसरता त्यांच्या निदर्शनास आणून देतो. हे पाहिल्यावर आमचेच आम्हाला वाईट वाटले. आणि इथल्या स्वाभिमानाला अलगद धक्का बसला,म्हणूनच आपल्यासमोर मांडत आहे.
शासनाचा एक कार्यक्रम संपला. आणि एक अधिकारी गर्दीतून वाट काढत पुढे आल्या, आणि आपल्या वरिष्ठांची चप्पल नेमकी कुठे ठेवली आहे, हि त्यांनी शोधून काढली. कार्यक्रम संपताच वरिष्ठ आले, आणि त्यांची वाट पाहत असलेल्या त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची चप्पल शोधून देण्यात त्यांना सहकार्य केले. हीच तत्परता जर आपल्या कामात दाखवली असती, तर नक्कीच जनतेने कौतुक करून अशा अधिकाऱ्यांना डोक्यावर घेतले असते. परंतु आपल्या खात्याचे तीन तेरा वाजले असतानाही हे अधिकारी मात्र वरिष्ठांशी लांगुलचालन करण्यात धन्यात मानत आहेत . या उप्पर काय बोलावे.
परंतु शाहुवाडी तालुका स्वाभिमानी रक्ताचा तालुका आहे. एकवेळ उपाशी राहू, पण कुणाशी लाळघोटेपणे वागणे, इथं जमत नाही. संदर्भीय अधिकाऱ्यांनी आत्तातरी भानावर यावे. अन्यथा पन्हाळगड आणि विशाळगड या सह्याद्रींच्या कुशीतील हा तालुका आहे,याची लवकरच प्रचीती येईल.

4+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!