शासनाच्या योजना लोकापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी- रणधीर नाईक

शिराळा : सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात आम्ही सरकारच्या माध्यमातून यशस्वी झालो आहे. नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चा तालुका पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत रहावे, असे प्रतिपादन युवा नेते रणधीर नाईक यांनी केले.
सिद्धेश्वरनगर (ता. शिराळा ) येथे यशवंत ग्लुकोज कारखाना कार्यस्थळावर शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपा युवा मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी नाईक म्हणाले, केंद्रात आणि राज्यातील दोन्ही सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या हिताच्या असल्याने, त्याचा फायदा आज देशातील तमाम जनतेचा विश्वास असलेला भाजपा हा एकमेव पक्ष आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त सदस्य नोदणी करून पक्ष गावा – गावात व वाडीवस्तीपर्यंत पोहचवला आहे. तालुक्यातील भाजपाची नूतन कार्यकारणी चांगल्या कामाची असल्याने, या पदाधिकाऱ्यांनी बूथ निहाय कमिट्या, युवा आघाडी व महिला आघाडी स्थापन करून पक्ष वाढविण्याचे काम केले आहे.
प्रारंभी शिराळा तालुका भाजपा युवा मोर्च्याच्या चिटणीस पदी निवड झालेबद्दल प्रवीण ढोले (इंग्रुळ) व शरद माने (बांबवडे) यांना निवडीचे पत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी, सुखदेव पाटील, सागर नाईक, वाळवा तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रोहित पाटील, शिराळा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, वसंत पाटील, अमित कुंभार, शरद गुरव, सरचिटणीस विनोद पन्हाळकर, रामचंद्र नायकवडी, विकास शिरसट, विश्वास कदम, संतोष गायकवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश गिरी यांनी केले. तर आभार युवा मोर्चाचे उपाध्यक्ष पिनू पाटील यांनी मानले.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!