बांबवडे चे श्री विष्णू यादव ‘ यशवंत सरपंच ‘ पुरस्काराने सन्मानित

बांबवडे : येथील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य श्री विष्णू यादव यान सन २०१७ करिता यशवंत पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण मतदारसंघातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने श्री विष्णू यादव यांचे हार्दिक अभिनंदन.
माजी सरपंच विष्णू यादव यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत बांबवडे गावामध्ये अनेक कौतुकास्पद उपक्रम राबवले होते.
त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबविताना घंटागाडी ची सुरुवात केली. यात त्यांना माजी महिला व बालकल्याण समिती च्या सभापती सौ.भाग्याश्रीदेवी गायकवाड यांचे सहकार्य लाभले. गावांतर्गत रस्ते, भाजी मंडई, जनावरांचा बाजार कॉन्क्रीटीकरण, दुकानगाळे, बालसाहित्य संमेलन, प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांच्या माध्यमातून प्रबोधन अशी अनेक विकासात्मक कामे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पार पाडली.
अशा अनेक उपक्रमांमधून आज श्री विष्णू यादव यांना यशवंत सरपंच पुरस्कार उद्या दि.१७ फेब्रुवारी रोजी मिळणार आहे. याचा समस्त बांबवडेकरांना अभिमान आहे.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!