नागाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेला ‘ सुमित ‘ शाहुवाडी तालुक्यातील विरळे गावचा

सोंडोली : शिवजयंती निमित्त वालचंद कॉलेज हून शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणांमधील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यापैकी एक सुमित संजय कुलकर्णी ,हा विद्यार्थी शाहुवाडी तालुक्यातील विरळे गावचा होता. या मृत्यूमुळे संपूर्ण कानसा खोऱ्यावर शोककळा पसरली आहे.
सुमित हा विरळे येथील सुशिक्षित शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी होता. प्राथमिक शाळेत असताना सुमित शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आला होता. माध्यमिक शाळेत १० वी त असताना त्याला ९५ % गुण मिळाले होते. सुमित मनमिळाऊ असल्याने परिसरात त्याचा मोठा मित्र परिवार आहे.
सुमित च्या दुर्दैवी अपघाताची बातमी येताच गावातील शिवजयंती निमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
चौकट : सुमित कुलकर्णी हा एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!