आदरणीय भिडे गुरुजींचे व्याख्यान हे, होणारच …

बांबवडे : शिवजयंती निमित्त बांबवडे तालुका शाहुवाडी इथं नियोजित आदरणीय श्री संभाजी भिडे गुरुजी यांचं व्याख्यान,नियोजित वेळेवर होणारच. असा निश्चय बांबवडे येथील संयुक्त शिवजयंती च्या कार्यकारिणीने तसेच ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान बांबवडे इथं संयुक्त शिवजयंती सोहळा १९,२०,२१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या सोहळ्याची सांगता आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या ओघवत्या भाषणाने करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. गुरुजी धर्मवीर संभाजीराजे या विषयावर बोलणार आहेत. परंतु काही संघटनांनी हि सभा उधळून लावण्याचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले आहे. याच अनुषंगाने शिवजयंती उत्सव कमिटी आणि ग्रामस्थांनी मात्र या वृत्ताला बळी पडणार नसल्याचे सांगितले आहे. भाषण स्वातंत्र्य हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या लोकशाही चाच हा एक भाग आहे. तेंव्हा शाहू ,फुले, आंबेडकर विचार प्रणालीला मानणाऱ्या मंडळींकडून अशा वर्तनाची अपेक्षा नाही. शाहू महाराजांच्या नावाने असलेल्या तालुक्यामध्ये विचार स्वातंत्र्याला विरोध करणे, म्हणजे शाहू महारजांच्या विचारांना विरोध केल्या सारखे होईल.
दरम्यान आदरणीय भिडे गुरुजींचे व्याख्यान हे होणारच ,असेही ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!