सजीव देखाव्यांसह भगवी शिवमय मिरवणूक बोरपाडळे इथ संपन्न

पैजारवाडी प्रतिनिधी :-
बोरपाडळे (ता .पन्हाळा) येथील आदर्शवत ठरलेल्या “एक गाव एक शिवजयंती” या संकल्पनेतून सलग दुसऱ्याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
घरोघरी भगवे झेंडे, गल्लोगल्ली भगवे पताके लावल्याने गावाचे वातावरण शिवमय होऊन गेले होते.
पहाटे पन्हाळगडावरून शिवज्योत आणण्यात आली.
छत्रपती चौकात उभारण्यात आलेल्या सुबक मंडपाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. .सकाळी शिवमूर्तीस अभिषेक घालून मूर्ती पूजन करण्यात आले.
दिवसा शाहिरी पोवाडे, व्याख्यान, स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी उंट, घोड्या सह शिवकालीन मर्दानी खेळ, धनगरी ढोल, हलगी, लेझीम पथक, अशी पारंपरिक वादये वाजवत, शिवरथाची मिरवणूक काढण्यात आली. तरुणांनी व महिलानी भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘ जय भवानी जय शिवाजी ‘ चा गजर करताना तरुणांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, स्वामी समर्थ, तुकाराम महाराज, मावळ्यां सह सजीव देखावे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. तसेच आवळी, नावली, पैजारवाडी, देवाळे, जेऊर, बोरिवडे, आरळे, आंबवडे या गावांमध्ये ही शिवजयंती शिवमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

2+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!