” निमंत्रण जिव्हाळ्याचे , शाहुवाडी च्या सह्याद्रीचे “

बांबवडे : एसपीएस न्यूज च्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त मुंबई इथं येत्या ८ एप्रिल रोजीदुपारी ३.०० वाजता कौतुकसोहळा व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कौतुक सोहळ्यास तमाम कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
हा कौतुक सोहळा राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार महादेवजी जानकर साहेब, उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई साहेब, गृहनिर्माण मंत्री नामदार रवींद्र वायकर साहेब उपस्थित रहाणार असून ,या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचे सन्मान होणार आहेत. या कार्यक्रमाला असेल मराठमोळ्या वाद्यवृंदाची साथ. तसेच या कार्यक्रमासाठी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, आमदार सुनील शिंदे, धैर्यशील माने, रोहितसिंह नाईक, सुरेश ठमके आदींसह इतर मान्यवर सुद्धा उपस्थित रहाणार आहेत.
सदरच्या “आम्ही वारस सह्याद्रीचे ” या कार्यक्रमाच्या पुरस्कार विजेत्यांची नवे लवकरच घोषित करण्यात येतील. तरी सह्याद्रीच्या या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाहन एसपीएस न्यूज च्या वतीने करण्यात येत आहे.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!