साळशी च्या जीवन शिक्षण विद्यामंदिरातून कर्तुत्ववान विद्यार्थी मिळतील : जिल्हापरिषद सदस्य पैलवण विजय बोरगे

बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील जीवन शिक्षण विद्यामंदिराची वाटचाल याशोशिखाराकडे सुरु असून भविष्यात या शाळेतून अनेक कर्तुत्ववान विद्यार्थी देशाला मिळतील, असे मत प्रतिपादन जिल्हापरिषद सदस्य व कोल्हापूर नियोजन मंडळाचे सदस्य पैलवान विजय बोरगे यांनी केले. साळशी तालुका शाहुवाडी इथं गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा श्री बोरगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी जीवन शिक्षण विद्यामंदिरचे यशवंत विद्यार्थी :
ई.१ली समृद्धी टॅलेंट सर्च (STS)
१) श्रुतिका पांडुरंग पाटील राज्यात प्रथम
२ ) श्रद्धा रणजीत पाटील राज्यात तृतीय
३ ) रुद्र अमर बोरगे बांबवडे परीक्षा केंद्रात द्वितीय
४ ) अनुष्का युवराज पाटील बांबवडे परीक्षा केंद्रात तृतीय
५ ) राजवीर मानसिंग पाटील बांबवडे परीक्षा केंद्रात तृतीय सुरेश पाटील सर
SMMTS परीक्षा :
ई.४ थी १ ) विश्वजित रामचंद्र पाटील राज्यात ९ वा -श्री राबाडे सर
ई.६ वी १ ) विश्वजित उत्तम मगदूम राज्यात ३ रा -श्री शिवाजी पाटील सर
ई.७ वी १ ) शुभम विक्रम बोरगे राज्यात ४ था
२ ) हर्षद दीपक पाटील बांबवडे परीक्षा केंद्रात प्रथम श्री संजय पाटील सर
ई.५ वी १ ) प्रियांका संजय पाटील गणित प्रज्ञा राज्यस्तर निवड श्री माने सर
ई. ७ वी प्रज्ञाशोध परीक्षा
१ ) धनश्री राजाराम पाटील शाहुवाडी तालुक्यात द्वितीय
२ ) सिद्धी विलास लोहार शाहुवाडी तालुक्यात सहावी श्री संजय पाटील सर
साळशी येथील या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य या सगळ्यांचाच कौतुक सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
केंद्र शासनाकडून शाहुवाडी तालुक्यात दोन प्रयोगशाळा मंजूर झाल्या असून, पैकी एक प्रयोगशाळा साळशी विद्यामंदिर ला मिळाली आहे. याबाबत सर्वच स्तरावरून विद्यामंदिर व त्यांचे शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!