महिला व बालविकास तसेच संरक्षण प्रकल्प विभाग रस्त्यावर …?

बांबवडे प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास तसेच सरंक्षण विभाग कार्यालय भाड्याच्या खुराड्यात सुरु आहे. शाहुवाडी पंचायत संमितीच्या भव्य इमारतीच्या समोर एका खोलीमध्ये या विभागाचे कार्यालय सुरु असल्याने जो विभाग शोषित पिडीत महिलांचे हक्क अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने तसेच त्या महिलांना सरंक्षण पुरविण्याच्या दृष्टीने शासनाने सुरु केला आहे. अशा विभागाचीच अवस्था असुरक्षित झाली आहे. यावर जिल्हा प्रशासन असो वा महाराष्ट्र शासन , यांनी निश्चितच दखल घेतली पाहिजे अशी चर्चा सामान्य वर्गातून ऐकायला मिळत आहे. शाहुवाडी तालुक्यातील शाहुवाडी पंचायत समितीची इमारत सुमारे साडे तीन कोटी रुपये खर्चून हि इमारत उभी केली आहे. अशाच प्रकारे तहसीलदार कार्यालयाची इमारत सुद्धा उभी केली आहे. परंतु एवढ्या मोठ्या इमारतींमध्ये महिला व बालविकास प्रकल्प विभाग तसेच संरक्षण अधिकार विभाग या महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेल्या विभागास दहा बाय बाराची जागा मिळू नये, यासारख दुसरं दुर्दैव नाही.
महिला व बालविकास प्रकल्प विभाग व संरक्षण अधिकारी विभाग अशा आशयाच कार्यालय शाहुवाडी तालुक्यात निर्माण केलं गेलं आहे. या विभागाच्या वतीने शोषित पिडीत महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच ज्या महिलांवर अन्याय होतो, अशा महिलांना संरक्षण देण्याचे काम सुद्धा केले जाते. अशा महत्वाच्या व महिलासंदर्भाने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विभागाला भाड्याच्या खोलीत आपलं कार्यालय सुरु ठेवावं लागतं. खऱ्या अर्थाने हा विभाग महिलांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने निर्माण केला आहे. अशावेळी त्यांना जागा देण्याचं औदार्य स्वराज्य संस्था दाखवू शकत नाहीत, हे दुर्दैवच आहे. त्याच पद्धतीने महसूल विभाग ऐकेकाळी उत्तरदायित्व सांभाळून होतं ते विभाग सुद्धा या कार्यालायला आपल्या प्रशस्त इमारतीत एखाद दालन देऊ शकत नाहीत, हि दुर्दैवाची बाबा आहे. एकंदरीत केवळ महिलांच्या हक्कांविषयी मोठ-मोठ्या जाहिराती शासन करतं तर तेच शासन अशा कार्यालायांना स्वराज्य संस्थांच्या इमारतीत वास्तव्य करून देत नाहीत. ज्या पंचायत समितीच्या सभापती महिला आहेत, त्यांना देखील महिलांची कणव येत नाही,या मागे राजकारण आहे का, किंवा महिला मधूनच महिलांविषयी ची सामाजिक बांधिलकी संपुष्टात येत आहे का, अशी शंका निर्माण होत आहे.
या विभागाचे शाहुवाडीचे अधिकारी श्री.योगेश नलवडे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रशासनाच्या नव्या कार्याबद्दल माहिती मिळाली. हे कार्यालय २०१६ पासून शाहुवाडी तालुक्यात सुरु असून शोषित पिडीत महिलांनी आपले न्याय हक्क व अधिकार मिळवण्यासाठी तसेच त्यांच्यावर शारीरिक अथवा मानसिक अत्याचार होत असल्यास संबंधित खात्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी, असेही आवाहन श्री.योगेश नलवडे यांनी Sps News शी बोलताना व्यक्त केले.

0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!