शिवसेनेच्या शिराळा-वाळवा संपर्क प्रमुख पदी श्री.आनंदराव भेडसे यांची नियुक्ती

मुंबई: सावर्डे बु. ता.शाहुवाडी चे सुपुत्र सध्या मुंबई येथे वास्तव्य असणारे , ज्योतिर्लिंग एन्टरप्राईजेस चे मालक श्री.आनंदराव भेडसे यांची शिवसेनेच्या शिराळा-वाळवा मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्री.आनंदराव भेडसे हे एक कामसू व्यक्तिमत्व आहे. गावाकडून मुंबई मध्ये येणाऱ्या प्रत्येकास ते मदतीचा हात देतात. शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यापासून आपल्या समाजकारणाला सुरुवात करणार हे व्यक्तिमत्व, नेहमीच दुसऱ्याच्या समाधानात स्वतःच समाधान मानत असतं. शाहुवाडीचे शिवसेनेचे आमदार श्री.सत्यजित पाटील यांचे ते खंदे समर्थक आहेत. असे असतानाही त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्यामध्ये ते कधीही भेदभाव करीत नाहीत. योग्य त्या कामांना न्याय देण्याचा ते नेहमीच प्रयत्न करीत असतात.
असं हे व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने समाजकारणातून राजकारणात प्रवेश करीत आहे. तालुक्यातील या नव्या राजकीय प्रवेशाला तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा . हि निवड सेनेचे प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसारच करण्यात आली. या निवडीवेळी उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई ,वरिष्ठ नेते श्री.गजानन किर्तीकर,श्री.नितीन भानुगडे – पाटील आणि इतर शिवसैनिक उपस्थीत होते.
श्री.आनंदराव भेडसे यांचे या निवडीबद्दल सा.शाहुवाडी टाईम्स व SPS NEWS च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!