भाजप च्या पेट्रोल,डीझेल दरवाढ विरोधात शिराळ्यात कॉंग्रेसचा तिरडी मोर्चा

शिराळा : शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व यंत्रणा अडचणीत आणून, त्यांच्या संसारावर नांगर फिरविण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा. उद्योगपती, सिनेताराकांना भेटून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून, कष्टकरी, शेतात राबणाऱ्यांना भेटून, त्यांना न्याय देणारे निर्णय घ्या, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या महागाई विरोधी मोर्चात ते बोलत होते. यावेळी बिऊर ते शिराळा महागाई विरोधी मोटरसायकल रॅली व एस.टी आगार ते तहसिल कार्यालय पर्यंत मोटरसायकल ढकल मोर्चा काढला. तसेच पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटरसायकल तिरडीवर ठेवून तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी २५०० मोटरसायकली तहसिल कार्यालयावर ढकलत आणून, सरकारचा पेट्रोल, डिझेल तर दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यात आला.
देशमुख पुढे म्हणाले कि , पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीत जगाच्या स्पर्धात भारत अव्वलस्थानी असेल. जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. जनतेचा खदखदणारा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी, मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन हातात घेतले आहे. सरकारी नोकरभरती थांबविल्याने तरुणांचे नुकसान होत आहे. सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा आहे.
यावेळी संग्रामसिंह पवार, संदीप जाधव, जयराज पाटील, जयकर कदम, आनंदराव पाटील, संपतराव देशमुख, सत्यजित पाटील, महादेव कदम, सम्राटसिंह शिंदे, हणमंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत तानाजी कुंभार तर प्रास्ताविक संभाजी नलवडे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख,, के.डी.पाटील, महादेव कदम, जयराज पाटील, संदीप जाधव, आनंदराव पाटील, पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, हिंदुराव नांगरे, सुजित देशमुख, बाजीराव पाटील, विकास नांगरे, एन.डी.पवार, श्रीरंग नांगरे, पोपट पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, अँड.रवि पाटील, अभिजित पाटील, सुहास पवार, बाबा पाटील, धनाजी नरुटे, संपत पाटील, भोजराज घोरपडे, राजवर्धन देशमुख, शिवाजी गायकवाड, डॉ.पी.डी.पाटील, अजय जाधव, मोहन पाटील, अशोक पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप कदम, उत्तम गावडे, बाळासाहेब खोत, प्रा.सम्राटसिंह शिंदे, जयदीप पाटील उपस्थित होते.

3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!