‘ यशराज ऑप्टीकल्स ’ चा खाकी वर्दीला अनोखा गारवा

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील यशराज ऑप्टीकल्स चे मालक ओंकार व मयूर कदमबांडे बंधूंनी शाहुवाडी तील पोलिसांसाठी इम्पोर्टेड सन गॉगल्स चे वितरण केले आहे. या माध्यमातून जी खाकी वर्दी जनतेसाठी अहोरात्र झटत आहे, त्यांच्या विषयी समाजाच्यावतीने आपल्याला शक्य ती मदत पोलीस बंधू आणि भगिनी यांच्यासाठी करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शाहुवाडी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक व त्यांचे पोलीस कर्मचारी लॉक डाऊन पाळण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला कोरोना सारख्या भयानक रोगापासून वाचविण्यासाठी आपले कर्तव्य उन्हातान्हातून बजावीत आहेत. सध्या उनाचा कडाका वाढत चालला आहे. त्यामुळे उनापासून संरक्षण व्हावे, व काही अंशी या पोलीस बांधवांना थंडावा मिळावा. याच हेतूने या बंधूंनी त्यांना सन गॉगल्स चे वितरण केले आहे.

सध्याच्या आणीबाणीच्या काळात पोलीस रस्त्यावर आहेत म्हणूनच आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. असे कृताज्ञातापुर्वक वक्तव्य ओंकार व मयूर कदमबांडे या बंधूंनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले.

या सन गॉगल्स चे वितरण सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, एएसआय पोवार आणि पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

7+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!