उदय साखर चे यंदाचे गाळप उद्दिष्ट साडेचार लाख मे. टन -मानसिंगराव गायकवाड दादा


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील मे. अथणी शुगर्स लि., उनीट २ अर्थात उदय सह. साखर कारखाना, बांबवडे – सोनवडे ,साठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करून सहकार्य करावे. तसेच यंदाचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट अंदाजे ४,५०००० मे. टन निश्चित केले असून,सर्व ऊस उत्पादक, शेतकरी सभासद बंधूंनी आपला ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मानसिंगराव गायकवाड ( दादा ) यांनी केले आहे.
आज दि. ३० जुलै रोजी कारखाना कार्यस्थळावर ” रोलर पूजन ” चा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री मानसिंगराव गायकवाड दादा बोलत होते.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक भगवान पाटील, चीफ इंजिनिअर एस.एस. पाटील, चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, कार्यालयीन अधीक्षक जगन्नाथ जोशी, शेती अधिकारी ए.ए. पाटील, सुभाष लठ्ठे, डीस्टीलरी इन्चार्ज किरण मुधाळे, प्रोजेक्ट हेड स्वप्नील देसाई, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष उत्तम मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी तालुका अध्यक्ष सुरज बंडगर, सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!