” ‘ प्रवीण ‘ ला गरज दानशूर हातांची “


बांबवडे : चरण तालुका शाहुवाडी येथील प्रवीण संजय हावळे वय ११ वर्षे या चिमुकल्यास समाजाच्या आंतरिक मदतीची गरज भासत आहे. या मुलाच्या दोन्ही किडन्या ८० % निकाम्या झाल्या आहेत. हा मुलगा कोल्हापूर येथील सनराईज हॉस्पिटल मध्ये दाखल आहे. तेंव्हा अनेक दानशूर व्यक्तींनी या चिमुकल्यास काही ना काही मदत करून, मृत्यू च्या दारातून परत आणण्यास सहकार्य करावे, असे आवाहन हावळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवीण संजय हावळे या शाहुवाडी तालुक्यातील चरण इथल्या मुलाची, जीवन आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये जोराचा संघर्ष सुरु आहे. कारण त्याच्या दोन्ही किडन्या ८० % निकाम्या झाल्या आहेत. त्याच्या उपचारास सुमारे १० ते १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याच्या कुटुंबीयांनी शेती तसेच मौल्यवान वस्तू विकून, या खर्चाची जुळवा जुळव करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अजूनही त्यांच्याकडे अपेक्षित रक्कम जमू शकलेली नाही. तेंव्हा तालुक्यातील तसेच देशातील दानशूर व्यक्तींनी आपला मदतीचा हात पुढे केल्यास या चिमुकल्याचे प्राण वाचू शकतील. तेंव्हा दानशूर व्यक्तींनी खालील बँक खात्यात रक्कम, मदत स्वरुपात जमा करावी, अशी विनंती मुलाचे वडील संजय हावळे यांनी केली आहे. संजय हावळे गुगल पे / फोन पे खाते क्र. ८३२९१०५६८८ . अॅक्सिस बँक खाते क्र. ९१७०१००४५२८६६२७ आयएफ एससी क्र. UTIB0000499.

7+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!