सामाजिक बांधिलकीतून फराळ वाटप : यशवंत पाटील


शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर शहर शिवसेनेच्या वतीने मलकापूर इथं धुनी-भांडी करणाऱ्या होतकरू महिलांना दिवाळी च्या फराळाचे वाटप करण्यात आले. हे वाटप शिवसेनेचे मा. संपर्कप्रमुख यशवंतराव पाटील मुंबई मुळ गाव सावर्डे यांच्या सौजन्याने करण्यात आले.

महिला फराळ वाटप कार्यक्रम


यशवंत पाटील हे कट्टर शिवसैनिक असून, गेली अनेक वर्षे ते समाजाची बांधिलकी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जपत आहेत. कधी अनाथाश्रमात मदत देवून, तर कधी पूरग्रस्तांना मदतीचा हात देवून, याही व्यातिरिक्त कधी कुणी संकटात असेल, आणि जर त्यांच्याशी संपर्क साधला, तर ते कोणत्या तरी पद्धतीने समाजातील गरजू लोकांना नेहमीच मदतीचा हात देत आले आहेत.

Advt


याच पद्धतीने कोरोना संक्रमण काळात ते मुंबईत असताना, तिथे देखील त्यांनी कोरोना योद्ध्याची भूमिका नेटाने बजावली आहे.

Advt.


सध्या कोरोना संक्रमणामुळे लोकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. हातावर पोट भरणाऱ्यांची, पोट भरायची पंचाईत झाली असताना, ते दिवाळी कशी साजरी करणार ?, यासाठी श्री पाटील यांनी धुनी-भांडी करणाऱ्या महिलांना फराळाचे वाटप करून, आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Advt


यावेळी तालुकाप्रमुख दत्ता पोवार, योगेश कुलकर्णी, दिनकर लोहार, आदी मान्यवरांसह महिला उपस्थित होत्या.

Advt
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!