बांबवडे इथं वीजबिल माफीसाठी वीजबिलांची होळी : भारतीय दलित महासंघ


बांबवडे : कोरोना संक्रमण काळात आलेली वीज बिले माफ करण्यात यावित्त, अन्यथा भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा गर्भित इशारा भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. दरम्यान या वेळी बांबवडे ता. शाहुवाडी इथं एसटी बस स्थानकासमोर वीजबिलांची होळी करण्यात आली.

वीज बिल होळी


कोरोना संक्रमण काळामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने कोरोना काळातील वीज बिले माफ करण्याचे आश्वासन सर्वसामान्य जनतेला दिले होते. दरम्यान हि वीज बिले माफ तर केलीच नाहीत, परंतु आणखी वाढीव वीज बिले शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सामान्य जनतेला पाठवली आहेत.
याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाने बांबवडे इथं निदर्शने केलीत. वीज बिल माफ व्हावे, अशा आशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना देण्यात आले.

स्वामी कलेक्शन


यावेळी राजीव सराटे, आकाश कांबळे, गणेश कांबळे, पंकज घोलप, विक्रमसिंह समुद्रे, प्रदीप माने, मनोज गायकवाड, जनार्दन कांबळे, सागर घोलप, चंद्रकांत काळे, अभिजित बनसोडे, आकाश कांबळे, श्रीनिवास खाडे, महेश हळूकुंडे, दत्तात्रय ठाणेकर, प्रकाश सळोखे, दयानंद कांबळे आदी मान्यवरांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!