तात्यासाहेब कोरे महाविद्यालयात पारितोषक वितरण समारंभ संपन्न

वारणा वार्ताहर :
वारणानगर ता पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषक वितरण समारंभ संपन्न झाला.
क्रीडा पारितोषक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. संभाजी पाटील तर प्रमुख अथिती म्हणून सचिन पाटील उपस्थित होते. या समारंभात इंटरक्लास, झोनल, लीड कॉलेज या पातळीवर खेळून वैयक्तिक, सांघिक यश संपादन करणाऱ्या २००हुन अधिक खेळाडूंचा गौरव करण्यात आला. अभिषेक जिरंगे हा खेळाडू नेपाळ इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या इंडिअन नँशनल डूयूबॉल त्रिकोणी स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असणार आहे, म्हणून सर्वांच्या वतीनं त्याचं विशेष अभिनंदन करण्यात आलं.
प्रमुख अथिती, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सचिन पाटील यांनी खडतर परिश्रमाने व ध्येयवेडे हून निश्चितच यश प्राप्त करता येते, हे स्वत:चे उदाहरण देऊन व्यक्त केले. यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २५ मुले प्रशिक्षण घेत असून, त्यातील ०८ मुले राज्य पातळीवर व ०५ मुले राष्ट्रीय पातळीवर आपलं क्रीडा कौशल्य दाखवत आहेत.
अध्यक्ष, प्रा. संभाजी पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कविता, गाणी, चारोळ्या यांचा वापर सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले कि, कीर्तन ऐकून कोणी सुधरत नाही, आणि तमाशा बघून कोणी बिघडत नाही. या उक्तीनुसार, स्वतःमध्ये सुप्त गुण ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे . तसेच त्यांनी त्यांच्या स्वलिखित ७ पुस्तकांचा व काव्यसंग्रहाचा संच प्राचार्यांकडे सुपूर्द केला. अमित कुंभार याने जिमखाना वार्षिक अहवाल वाचन केले.
याप्रसंगी, प्राचार्य, डॉ. एस. व्ही. आणेकर म्हणाले कि, सांघिक यशासाठी संघनायकाच्या निर्णयाबरोबर प्रामाणिक, चिकाटीने, सातत्याने काम केल्यास अत्युच्च शिखर प्राप्त करता येते.
महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातर्फे देण्यात येणारी मानाची जनरल चॅम्पियनशीप मेकेनिकल विभागाने पटकावली. मा.विनयराव कोरे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमास डिप्लोमा प्राचार्य बी.व्ही. बिराजदार, जिमखाना प्रमुख प्रा. बी. आय.कुरणे , डिप्लोमा जिमखाना प्रतिनिधी एस.एस.चव्हाण, डिप्लोमा विध्यार्थी प्रतिनिधी कौस्तुभ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. विवेक शेटे , प्रा.आर.बी.नाईक, प्रा ए.टी. सोनाळे, प्रा. पी. व्ही.मुळीक, प्रा देहणकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे प्रमुख डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. मार्क मोनीस, प्रा. गणेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. मुख्य सूत्रसंचालन भूषण चौधरी, ऋषीकेश खाडे, शीतल सूर्यवंशी आणि अपूर्वा जाधव यांनी केले. विद्यार्थिनी क्रीडा प्रतीनीधी ऐश्वर्या कुंभार हिने आभार मानले.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: