वारणानगर येथे अपघातात दोघे गंभीर जखमी
कोडोली प्रतिनिधी : वारणानगर ता.पन्हाळा येथील वाठार रत्नागिरी हायवे वरील गॅलेक्सी हॉस्पिटल समोर आज दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या महिंद्रा पिकअप (गाडी क्रमांक MH10AQ5645) आणि माईस्ट्रो स्कुटी (मोटार सायकल क्रमांक MH09ED8251) यांच्यात झालेल्या अपघातात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक दिलीपकुमार नानासाहेब भोसले( वय ५८ रा. वारणानगर) व शिपाई सतीश शामराव मांगले (वय ४२ रा. निगवे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
यावेळी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार महिंद्र पिकअप वारणानगरच्या दिशेने जात होती तर भोसले आणि मांगले हे रास्ता क्रॉस करत होते.रास्ता क्रॉस करत असताना महिंद्रा पिकअपच्या अचानक आडवे आल्याने पिकअपची मोटार सायकलला जोराची धडक बसून हा अपघात झाला. दोघाना उपचारासाठी वारणानगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे तर मांगले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.याबाबत अधिक तपास कोडोली पोलीस ठाणे करत आहे.