तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिंपेची वर्षाराणी पाटील प्रथम

सरूड : शिंपे तालुका शाहुवाडी येथील महिला पैलवान वर्षाराणी पाटील हिने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्याने तिचे सरूड पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

शिंपे गावाला पहिल्यापासूनच कुस्तीची परंपरा आहे, शिवाय वडील कृष्णा पाटील यांची जिद्द अन् वर्षाराणी ची इच्छा यांमुळे ती गावातील पहिली महिला पैलवान बनली. तिने पैलवान  अनिल पाटील (मुंबई पोलीस )यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीला सुरुवात केली. आजपर्यंत तिने 41 मैदानावर आपली खेळी दाखवली आहे. यावेळेस तिने दुसऱ्यांदा तालुकास्तरीय यश मिळवून दुहेरी यश मिळविले. गतवर्षी जिल्हा स्तरावर दोन फेरीपर्यंत मजल मारली. यावेळी मात्र ती नक्कीच जिल्हास्तरावर यश मिळवेल, हा तिचा  आत्मविश्वास आहे. तिला पै. अनिल पाटील (मुंबई पोलीस ), युवराज काळे, तिचे चुलते रंगराव पाटील व वडील कृष्णा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 

3+
3+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: