येत्या १० ऑक्टोबर ला शेतकऱ्यांसाठी नवी संघटना – शिवाजी माने

बांबवडे : शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व जातीधर्माच्यावतीने शेतकऱ्यांसाठी एक नवी संघटना नावारूपाला येत आहे. अशी संघटना कि,जी सर्व जाती धर्मांना सामावून घेवून, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारी संघटना असेल, अशा संघटनेची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन इथं १० ऑक्टोबर रोजी ४.३० वाजता मेळावा बोलवण्यात आला आहे. या मेळाव्याला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवाजी माने यांनी पत्रकार परिषदेत केले.

बांबवडे तालुका शाहूवाडी इथं पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी शेतकऱ्यांना मेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी माने पुढे म्हणाले कि, खासदार राजू शेट्टी यांनी आमचा कडीपत्त्यासारखा वापर करून घेतला. संघटनेत जातीयवाद निर्माण करून, मराठा समाजाला बाजूला काढून टाकले.

शेतकऱ्यांसाठी राईस मिल निर्माण केली, पण नेली मात्र शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव मध्ये. ज्या तालुक्यांनी यांना डोक्यावर घेतले, त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली. हीच राईस मिल शाहूवाडी, पन्हाळा सारख्या दुर्गम भागात काढली असती, तर इथल्या शेतकरी वर्गाच्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता. निम शिरगाव इथं काढलेल्या राईस मिल मध्ये कुटंबातील संचालक, तसेच एक मराठा संचालक सोडला, तर इतर मात्र स्वत:च्या च समाजातील संचालक झाले आहेत. या अन्यायाविरोधात खदखद निर्माण झाली होती. येत्या १० ऑक्टोबर ला एक नवीन संघटना उदयाला येणार असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, या संघटनेची स्थापना असणार आहे.

स्वत:च्या अस्तित्वासाठी कोणत्याही पक्षांशी युती करणाऱ्या या मंडळींना शेतकरी काय असतो? याची जाणीव पुन्हा करून दिली जाईल. दहीहंडी फोडणारा एकाच असतो, परंतु त्याला आधार देण्यासाठी शेकडो हात खाली पसरलेले असतात, याची जाणीव दहीहंडी फोडणाऱ्याने ठेवायची असते. असेही श्री शिवाजी माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी धनाजी पाटील, शिवाजी शिंदे, बाबासाहेब पाटील भुये, उत्तम पाटील, भीमराव पाटील सरुडकर, गोरक्ष पाटील डोणोली, शिवाजी शिंदे,विलास खुटाळे, सुनील वाणी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0
0

One thought on “येत्या १० ऑक्टोबर ला शेतकऱ्यांसाठी नवी संघटना – शिवाजी माने

  • October 7, 2018 at 10:08 pm
    Permalink

    Bhagatil news amchya paryant pohchavnyasati tumche abhar MUKUND POWAR……

    0
    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: