प्रा.डॉ.एन. डी पाटील महाविद्यालयाच्यावतीने खुल्या मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

मलकापूर प्रतिनिधी :

पेरीड – मलकापूर ता० शाहूवाडी येथील प्रा.डॉ.एन. डी पाटील महाविद्यालय यांच्या वतीने  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्म शताब्दी  निमित्त घेण्यात आलेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटात विकास बळवंत पाटील यांनी, तर महिला गटात तृप्ती विक्रम पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी स्पर्धकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धा पेरीड नाका ते कडवे अशी सहा किलोमीटर अंतरांची पार पडली.

शाहुवाडीचे तहसिलदार चंद्रशेखर सानप, माजी आमदार राऊ पाटील, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, यांच्या हस्ते या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. स्पर्धेत पुरूष गटात ६५ तर महिला गटात ५९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील अन्य विजेते पुढील प्रमाणे : पुरूष गटात राहुल ईश्वरा पाटील द्वितीय,त्रृषीकेश रामचंद्र लाड तृतीय तर महिला गटात शहिदा रहीम मुलाणी द्वितीय, पुजा संपत कदम तृतीय यांनी अनुक्रमे क्रमांक  पटकविला .

प्राचार्य डॉ.सुनिल कांबळे,  माजी आमदार राऊ पाटील, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, , भारत पाटील, प्रा. एस. के. खोत, प्रा.एस. डी. मिसाळ, प्रा. दिंगबर भोगे, प्रा. राजेंद्र सुतार, प्रा.डॉ. ए. पी. उबाळे, प्रा.एस. जी. माने आदि उपस्थित होते .

 

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: