साहिल भोसले गुणवंत खेळाडू पुरस्काराने सन्मानित: शारीरिक शिक्षक संघटना

बांबवडे : शाहूवाडी तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिवारे-माणगाव विद्यामंदिर च्या साहिल भोसले यास तालुकास्तरीय गुणवंत खेळाडू पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

शिवारे गावच्या एका गरीब कुटुंबातील साहिल असून तो  केंद्रीय प्राथमिक शिवारे- माणगाव विद्यामंदिर च्या सातवी इयत्ते मध्ये तो शिकत आहे. शालेय स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत अनेकवेळा स्पर्धांमध्ये यश मिळवून शाळेचे नाव मोठे केले आहे. यावर्षी त्याने केंद्र स्तरावर उंच उडी, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, कुस्ती मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. अशा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून त्याने शाळेचे नाव उंचावले आहे. म्हणूनच त्याला गुणवंत खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. साहीलला श्री सी.पी.गुरव, सु.ल.नलगे, पी.एन.कांबळे, पी.पी.लोहार, शी.भ.मोहिते, स.श्री.जाधव, श्री सुतार,श्री मोहिते आदींचे मार्गदर्शन लाभले.

1+
1+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: