पुढाऱ्यांचा शिक्षक बदल्यांमध्ये हात ?

 बांबवडे : एकीकडे शिक्षक पाहिजे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे मात्र त्याच क्षेत्रात शिक्षक बदली साठी चिरीमिरीच्या अपेक्षा ठेवायच्या, म्हणजे लहान विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पुढारी करीत आहेत काय ? असा प्रश्न जनतेतून विचारला जावू लागला आहे. काही दिवसांपूर्वी एका नामांकित दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बांबवडे तालुका शाहूवाडी येथील “तो तरुण पुढारी कोण ” या वृत्ताबाबत एसीबी विभागाने नेमकी काय चौकशी केली,आणि त्याचे फलित काय झाले? याचे उत्तर अद्याप जनतेला मिळालेले नाही.

वरील संदर्भानुसार शिक्षक बदली प्रकरणात काही पुढाऱ्यांनी पैशाची देवाण घेवाण केली असल्याचे समजते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या वतीने बांबवडे येथील एका तरुण पुढाऱ्याला चौकशी साठी नेले होते.पण नेमकी चौकशी काय झाली ,हे अद्याप या खात्याने सांगितलेच नसल्याने इथं देखील संशयाचे ढग दाटून आल्यासारखे वाटत आहे.

एकीकडे आपण खूप सामाजिक कामात सहभागी असून जनतेचे प्रश्न सोडवीत आहोत ,असे जरी दाखवत असले तरी तत्सम पुढाऱ्यांचे नेमके काय धंदे चालू आहेत. हेच या एकंदरीत प्रकरणावरून समजते.

0
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: