वाढदिवस काळजातल्या कार्यकर्त्याचा : संग्राम खराडे ….

बांबवडे : रणवीर युवा शक्तीचे अध्यक्ष संग्राम खराडे यांचा आज वाढदिवस. एका सच्चा कार्यकर्त्याचा वाढदिवस निश्चितच प्रत्येकजण लक्षात ठेवणार आहेत. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना एसपीएस न्यूज व सा.शाहूवाडी टाईम्स च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वभावावर टाकलेला एक कवडसा.

संग्राम खराडे हे व्यक्तिमत्व रणवीर युवा शक्ती च्या माध्यमातून समाजासमोर आलं. आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवणारा, आणि त्यांच्यावर निर्व्याज प्रेम करणारा हा तरुण नेहमीच हसतमुख असतो. उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्यावर जीवापाड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्वं तसं पहायला गेलो, तर मानसिंग दादा घराण्यावर केंद्रित झालेलं आहे. त्यांच्याशिवाय दुसरं नाव त्यांच्या तोंडून निघत नाही. अशा या गोड व्यक्तिमत्वाचा आणि निस्वार्थी सेवावृत्तीचा वाढदिवस निश्चितच अभिनंदनीय आहे. या हसतमुख चेहऱ्यामागे चिंतेचे अनेक पर्वत उभे आहेत,हे कधी कुणाला दिसत नाहीत. कितीही ताण तणाव असला तरी हि व्यक्ती तो तणाव चेहऱ्यावर येवू देत नाही. घरातील अनेक अडचणींना सामोरे जावून हि व्यक्ती नेहमी हसतमुख कशी ? असा प्रश्न  सुद्धा आमच्यासारख्या जवळच्या मित्रांना पडल्याशिवाय रहात नाही. या सगळ्या कारभारात त्यांच्या घरच्यांनी मात्र त्यांना चांगली साथ दिली आहे. त्याचबरोबर दस्तुरखुद्द रणवीर सरकार सुद्धा या जवळच्या काळजाच्या कार्यकर्त्याला कधी विसरत नाहीत. असो. अशा या आमच्या लाघवी मित्राचा आजचा वाढदिवस निश्चित गोड व्हावा. त्यांना दीर्घायुरोग्य लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

4+
4+

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
%d bloggers like this: